धरतीपुत्र हवामान अंदाज (२२ जुलै): आज संपूर्ण महाराष्ट्र कव्हर होणार! ५ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम

धरतीपुत्र हवामान अंदाज (२२ जुलै): आज संपूर्ण महाराष्ट्र कव्हर होणार! ५ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Sandip N Nakade

Published:

तोडकर यांचा हवामान अंदाज: आज संपूर्ण महाराष्ट्र कव्हर होणार, बळीराजाला मोठा दिलासा! (२२ जुलै २०२६)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे ९० टक्के शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, जे काही वंचित भाग राहिले होते, त्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. 'धरती पुत्र' (तोडकर) यांनी २२ जुलै २०२६ रोजी दिलेल्या नवीन अंदाजानुसार, आज संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाची व्याप्ती वाढणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. "देवाच्या घरी देर आहे पण अंधेर नाही", अशी प्रचिती आजच्या पावसामुळे येईल.

 

आज (२२ जुलै) आणि उद्याची (२३ जुलै) स्थिती:

  • मराठवाडा: आज संपूर्ण मराठवाड्यात पावसाचे वातावरण राहील. परभणी जिल्ह्यामध्ये 'आऊट ऑफ कंट्रोल' म्हणजे सर्वदूर झडीसारखा पाऊस असेल. लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेड जिल्ह्यातही आज संध्याकाळपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

  •  

  • विदर्भ आणि खानदेश: अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि बुलढाणा या भागात जोरदार सटकारे आणि झडीचे सत्र राहील. विदर्भ आणि खानदेशात उद्या (२३ जुलै) देखील पावसाचा जोर कायम राहील.

  •  

  • पश्चिम महाराष्ट्र व कोकण: पुणे, सांगली, सोलापूर आणि कोकण पट्ट्यात आज पावसाचा जोर वाढत आहे. संध्याकाळपर्यंत या भागात अतिशय चांगला आणि दमदार पाऊस पाहायला मिळेल.

  •  

  • वाऱ्याचा प्रभाव (२३ जुलै): उद्या २३ तारखेला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात वाऱ्याचा जोर वाढेल, त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण थोडे कमी होईल, मात्र ढगाळ वातावरण टिकून राहील. कर्नाटक आणि बेळगाव भागात २३ तारखेला पाऊस वाढेल.

  •  

पुढील १० ते १५ दिवसांचा अंदाज (२४ जुलै ते ५ ऑगस्ट):

  • २४ जुलै: धुळे, खानदेश ते छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या पट्ट्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढेल.

  • २५ जुलैपासून पाऊस उघडणार नाही: अनेक जण २५ तारखेपासून पाऊस उघडणार असल्याचा अंदाज देत आहेत, मात्र तोडकर यांच्या अंदाजानुसार पावसाचे वातावरण टिकून राहील.

  •  

  • विहिरी आणि बोअरला पाणी येणार: २६ आणि २७ जुलैपासून पावसाचा दुसरा मोठा टप्पा सुरू होईल. या पावसामुळे अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, लातूर आणि नांदेड या भागात विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होईल. हा पाऊस ४-५ ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने पडत राहील.

  •  

  • चक्रीवादळाची शक्यता: २८-२९ जुलै दरम्यान बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सध्या पावसाळा सुरू होऊन फक्त एक महिना झाला आहे आणि अजून तीन महिने बाकी आहेत. पुढील काळात राज्यातील धरणे, नदी-नाले भरतील आणि दुष्काळाचे सावट पूर्णपणे दूर होईल. शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या शेतीची कामे सुरू ठेवावीत.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा