अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानास शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मिळणार मदत…

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानास  शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मिळणार मदत…

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानास  शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मिळणार मदत…

या वर्षात जानेवारी पासून मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनाम्यानुसार २ लाख ९१ हजार ४३३ हेक्टर शेतीतील शेत पिकांचे नुकसान झालेले दिसून आहे.

तर या नुकसानाची मदत शासन एन.डी.व्ही.आय (सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक) च्या निकषानुसार १५ जुलै २०२४ पर्यंत करणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे.

अवकाळी पाऊस नुकसानाबाबत सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. पाटील म्हणाले , नुकसानाबाबत मदतीचा ४९५ कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मिळाला झाला आहे. याबाबत ५ फेब्रुवारी २०२४ च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार प्रस्ताव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून एन.डी. व्ही.म आय चे निकष तपासून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून आल्यानंतर मागणीनुसार १५ जुलै २०२४ पर्यंत मदत करण्यात येईल. आणि तसेच फळबागांच्या नुकसानाबाबतही मदत देण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.