बी.बी.एफ तंत्रज्ञानाने केलेली, शेती अधिक पावसात अधिक फायदेशीर ठरते …

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

बी.बी.एफ तंत्रज्ञानाने केलेली, शेती अधिक पावसात अधिक फायदेशीर ठरते …

बी.बी.एफ तंत्रज्ञानाने केलेली, शेती अधिक पावसात अधिक फायदेशीर ठरते …

 

बी.बी.एफ. पद्धत ही शेतीसाठी एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जी शेतकऱ्यांना पिकांची जोमदार वाढ आणि उत्पन्न वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीमध्ये उतारास आडवी पेरणी केल्याने मुलस्थानी जलसंधारण होते, ज्यामुळे पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते आणि शेतात पाणी साचत नाही.

सध्या शेती पीक पद्धतीत दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहेत. ज्यामुळे जास्तीतजास्त फायद्याची शेती करणे सोपे झाले आहे. मात्र या सर्वांचा वापर अध्याप काही अंशी सीमित असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या आधुनिक पद्धतींचा उपयोग करणे आवश्यक आहे. याकामी कृषि विभाग देखील वारंवार जनजागृती करून शेतकर्‍यांना जागरूक करत आहे.

अलीकडच्या काळात बी.बी.एफ हे एक नवीन तंत्रज्ञान शेती लागवड पद्धती करिता विकसित झाले असून याचे शेतकरी बांधवांना अनेक फायदे होत आहे. सध्या सोशल मीडियावर या बी.बी.एफ पद्धत वापरुन लागवड झालेल्या शेताचा एक व्हिडिओ चांगलाच ट्रेंड होत आहे. ज्यात असे दिसते की, बी.बी.एफ पद्धत वापरून लागवड केल्याने शेतात पावसाचे पाणी न साचता ते शेताबाहेर निघाले आहे.

सोबतच शेजारी शेतात बी.बी.एफ तंत्रज्ञानाचा वापर न केल्यामुळे पावसाचे पाणी शेतातच साचले गेले आहे. पावसाळ्यात पाणी न साचल्यामुळे पिकांची हानी होत नसल्याने बी.बी.एफ शेतकर्‍यांसाठी फायद्याचे ठरत आहे.

 

बी.बी.एफ. पेरणी यंत्राचे विविध फायदे:

 

• बी.बी.एफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होते.
• बी.बी.एफ पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. पावसाच्या दिर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो. तसेच आंतरपिक पध्दतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न घेता येते.
• पिकास मुबलक हवा सुर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होऊन पीक पिक किड रोगास बळी पडत नाही.
• बीबीएफ पध्दतीने निविष्ठा खर्चात (बियाणे, खते इ.) २० ते २५% बचत होते.
• खत व बियाणे एकाच वेळी पेरल्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होतो.
• उत्पन्नामध्ये २५ ते ३०% वाढ होते.
• वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्यामुळे पर्जन्यामान खंडाच्या कालावधीत सुध्दा पाण्याचा ताणाची तीव्रता कमी होते.
• जास्त पर्जन्यमान झाल्यास या पध्दतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.
• पिकामध्ये अंतर मशागत करणे उभ्या पिकांस सरी मधून फवारणी यंत्राव्दारे किटकनाशक फवारणे शक्य होते.
• या पध्दतीचा अवलंब केल्याने जमिनीची धुप कमी प्रमाणात होऊन सेंद्रीय कर्बाचा हास थांबल्याने जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
• या पध्दतीमुळे जमिनीची सच्छीद्रता वाढून जमिन भूसभुसीत होते. परिणामी पिकाची वाढ उत्तम होते.