पावसात लष्करी अळीचा धोका वाढतोय! प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे ५ उपाय जाणून घ्या...

13-07-2025

पावसात लष्करी अळीचा धोका वाढतोय! प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे ५ उपाय जाणून घ्या...
शेअर करा

पावसात लष्करी अळीचा धोका वाढतोय! प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे ५ उपाय जाणून घ्या...

सध्या राज्यात भात लागवडीला वेग आलेला असताना, वातावरणातील बदल – सततच्या ऊन-पावसाच्या लहरी – भात पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढवत आहेत. विशेषतः लष्करी अळी आणि खोडकिडा यांचे रोपवाटिकांमध्ये आणि लहान भात रोपांवर आक्रमण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

लष्करी अळीचा भात पिकावर प्रभाव – लक्षणं ओळखा:

  • लष्करी अळी पावसाने निर्माण केलेल्या उघडीप आणि वाढत्या तापमानात लवकर वाढते.
  • ही कीड रोपवाटिकेपासूनच भात पिकावर हल्ला करते.
  • पाणी नसलेल्या भातखाचरात अळी जमिनीतील भेगांमध्ये, बांधावरील गवतामध्ये किंवा चुडांमध्ये लपते.
  • रात्रीच्या वेळी ही अळी भात रोपांवर चढून लोंब्या कुरतडते.
  • लोंब्या फुलण्याआधीच नष्ट झाल्यामुळे दाण्यांचा उत्पादनात मोठी घट होते.
  • ही कीड एका रात्रीत संपूर्ण क्षेत्रात नुकसान करू शकते.

प्रभावी व्यवस्थापनाचे उपाय:

पाण्याचे व्यवस्थापन:
जिथे पाण्याची उपलब्धता आहे तिथे प्रादुर्भावित भातशेतीत पाणी साठवा. अळ्या जमिनीत लपण्याऐवजी रोपांवर येतील आणि पक्ष्यांचे शिकार बनतील.

पक्षी थांबे उभारणे:
शेतीत पक्ष्यांसाठी बांबू किंवा काठीचे थांबे उभे करा, जेणेकरून पक्षी नैसर्गिक कीड नियंत्रण करतील.

चर खोदून पाणी अडवा:
अळी एक शेतातून दुसऱ्या शेतात जाऊ नये म्हणून भातशेतीच्या कडेला चर (बंदी) खोदून त्यामध्ये पाणी भरून ठेवा.

सामूहिक मोहिम राबवा:
शेजारील शेतकरी एकत्र येऊन सामूहिक नियंत्रण उपाय योजना केल्यास लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी करता येईल.

शेतकऱ्यांना सूचना:

लष्करी अळीचे लक्षणं दिसताच विलंब न करता योग्य उपाययोजना राबवा. एकट्याने नाही, तर संपूर्ण गावस्तरावर एकत्र येऊन नियंत्रणासाठी पुढाकार घ्या.

हे पण पहा: गाय-म्हैस गाभण राहिली का? आता फक्त १० रुपयांत समजणार!

कीड नियंत्रण, भात शेती, भात किडी, rice kid, lashkari alai, पिक संरक्षण, kid niyantran, शेती सल्ला, लष्करी अळी, भात पीक

शेअर करा
Loading

संबंधित शेती विषयक माहिती

Loading

शॉप

Loading