महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय; पुढील 8 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय; पुढील 8 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

 राज्यात आठ दिवस मुसळधार पाऊस; नदी नाल्यांना येणार पूर.


 महाराष्ट्रात पुढील आठ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारपासून पावसाला सुरुवात होईल.
महाराष्ट्रात पुढील 8 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

जोरदार पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.

रखडलेल्या पेरण्यांना वेग मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार.

 

राज्यात मान्सूनचं आगमन झालं खरं पण अजूनही अनेक जिल्हे पाण्यावाचून कोरडे पडलेत. बहुतेक जिल्ह्यात पावसाचा एक थेंब पडला नाहीये. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेत. पण बळीराजाला दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. राज्यात लवकरच पावसाला सुरूवात होईल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलाय. हवामान विभागानेही राज्यातील पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे.


राज्यात पंधरा दिवसापूर्वीच मान्सून दाखल झाला आरहे, परंतु अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. परंतु आता उकाड्यापासून सुटका होणार असून संपूर्ण राज्यात धो-धो अशा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस होणार आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा देखील नवा अंदाज समोर आला आहे.


काय आहे नवा अंदाज
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार येत्या 21 जूनपासून ते 30 जूनपर्यंत राज्यात चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र एकाचवेळी होणार नाही, मात्र तो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये हजेरी लावेल. पावसाला साधारणपणे विदर्भातून सुरूवात होईल आणि त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असं संपूर्ण राज्य मान्सून व्यापून टाकेल. 21 जून ते 30 जून हे आठ दिवस राज्यात जोरदार पाऊस होईल.