पंजाबराव डख यांचा आजचा हवामान अंदाज, 'या' दिवशी होणार मुसळधार पाऊस...?
02-06-2025

पंजाबराव डख यांचा आजचा हवामान अंदाज, 'या' दिवशी होणार मुसळधार पाऊस...?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला. काही भागांत आता पाऊस थांबला असला तरी, पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार लवकरच पुन्हा पावसाची सुरुवात होणार आहे.
मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नद्या-नाले भरले, धरणात पाणी वाढले आणि साठा चांगला झाला. पण आता हवामान थोडं बदलणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी शेतीची कामं योग्य वेळी पूर्ण करावीत, असा सल्ला दिला आहे.
पुढील पावसाचा अंदाज:
डख यांच्या अंदाजानुसार, 7 ते 10 जून दरम्यान थोडा ते मध्यम पाऊस राज्यातील बऱ्याच भागांत होईल. त्यामुळे ज्यांनी अजून शेतीची तयारी केली नाही, त्यांनी 6 जूनपर्यंत तयारी पूर्ण करावी.
हळद लागवड किंवा मूग पेरणी करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. मूग पीक लवकर पेरलं तर उत्पन्न चांगलं मिळतं.
उडीद पेरणीसाठीही योग्य वेळ:
जमिनीत 1 ते 2 फूट खोलपर्यंत ओल गेली आहे. त्यामुळे उडीदसारखी पिकंही पेरायला ही वेळ चांगली आहे.
डख यांनी सांगितले की 13 ते 17 जून या काळात पुन्हा एकदा जोरात पाऊस पडेल. त्यामुळे शेतकरी वेळेत पेरणी करतील आणि जून अखेरपर्यंत बहुतांश भागांतील पेरणी पूर्ण होईल.
कुठल्या भागात पाऊस होईल?
- 3 आणि 4 जून – नंदुरबार, धुळे, मालेगाव, पारोळा, जळगाव येथे हलक्याशा सरी
- 31 मे ते 7 जून – कोल्हापूर भागात पावसाचं वातावरण
- 4 आणि 5 जून – नंदुरबार व धुळे येथे पुन्हा थोडा पाऊस
- 1 ते 6 जून – संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी अचानक पावसाच्या सरी
शेतकऱ्यांसाठी सल्ला:
शेतकऱ्यांनी हवामानाचा विचार करून शेतीचं योग्य नियोजन करावं. मातीतील ओल पाहूनच पेरणी करावी, म्हणजे उगवण चांगली होईल आणि पीक भरघोस येईल. हवामान बदलत आहे, त्यामुळे सावध राहणं आणि योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे.
हे पण पहा: फळपिकांसाठी कव्हर, तण आच्छादन व हायड्रोपोनिक्ससाठी मिळतंय अनुदान, अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या..!