महाराष्ट्र हवामान अंदाज: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार!

महाराष्ट्र हवामान अंदाज: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार!
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Suraj Ghodke (null)

Published:

बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा; राज्यात 'या' तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. १३ ते २० ऑगस्ट या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.


तसेच २० ते २७ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.


हवामान विभागाने हवामानासंबंधित एक महत्त्वपूर्ण अंदाज जाहीर केला आहे. येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. तसेच चालू महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम बंगाल आणि त्याला लागून असलेल्या बांगलादेशच्या आकाशात चक्राकार वारे वाहत आहेत. या कारणामुळे पुढील २४ तासांत पश्चिम बंगालची किनारपट्टी आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे.


दरम्यान, पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये मागील २४ तासांत ८२.५ मि.मी. पाऊस पडला आहे. तर या हंगामात एकूण ५ हजार १६ मि.मी. पाऊस नोंदविण्यात आला आहे. ओडिशा, केरळ, कर्नाटकमध्ये 'जोर'धारा 

◼️ ओडिशाच्या काही भागांत अतिशय मुसळधार पाऊस पडू शकतो. केरळ, कर्नाटक (किनारपट्टी व दक्षिण भाग), पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. 

◼️ मध्य महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा