महाराष्ट्रात पावसाची दमदार एंट्री! विदर्भातून सुरुवात, मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात पावसाची दमदार एंट्री! विदर्भातून सुरुवात, मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Sandip N Nakade

Published:

महाराष्ट्रात पावसाची दमदार एंट्री! विदर्भातून सुरुवात, मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज

 

विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार, पूर्व विदर्भ. म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या पट्ट्यामध्ये काय होईल, जरा लवकर पाऊस येईल. तर तिथे लवकर पेरण्या सुरू होतील. त्यानंतर पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे पाऊस येईल. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे येईल. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल. आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे. उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, २३-२४ जूनच्या नंतर मग तिकडे देखील चांगला पाऊस पडेल. २३ ते ३० मात्र उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पाऊस पडेल. 

 

 मुंबईला देखील चांगला पाऊस पडणार आहे या शेवटच्या आठवड्यात, म्हणून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबईला तर मुसळधार पाऊस पडेल. पुन्याकडे (पुण्याकडे) देखील पडेल, कोकणात देखील पडणार आहे. मुंबईला काही ठिकाणी म्हणजेच पहिलाच पाऊस असा पाऊस पडेल की, म्हणजे चांगला मुसळधार, अतिवृष्टीसारखा मुंबईला देखील पाऊस पडेल. म्हणून हे देखील मुंबईकरांनी अंदाज लक्षात घ्यायचा. जूनच्या शेवटच्या आता आठवड्यात मुंबईला देखील पाऊस राहील, पुण्याला देखील राहील, कोकण घाट माथ्यावर देखील चांगला पाऊस पडेल. पण पाऊस येणार आहे, शेवटच्या आठवड्यात येणार आहे.

 

 सर्वप्रथम मी पहिल्यापासूनच काय म्हणालो होतो, की निसर्ग... निसर्गाकडे, झाडांकडे कोणी लक्ष देत नाही. तुम्हाला सांगतो, वाढत्या तापमानामुळे काय झालं, निसर्ग २२ दिवस पुढे सरकला. उन्हाळा २२ दिवस पुढे सरकला, पावसाळा २२ दिवस पुढे सरकला आणि हिवाळा २२ दिवस पुढे सरकला. दरवर्षी ७ जूनला पाऊस येतो ना, मग त्या ७ जूनमध्ये २२ मिसळा ना, मग किती व्हायलेत? दरवर्षी २५, २६, २७, २८ जूनला महाराष्ट्रात पेरण्या लागतील, म्हणून हे वर्षोनुवर्षाचा अंदाज लक्षात घ्या.

 

 आता पुढच्या वर्षी २०२७ ला देखील अशीच परिस्थिती राहणार. २०२७ ला देखील काय होणार, जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पेरण्या होणार. २८ ला देखील अशीच परिस्थिती राहणार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणार. २०२९ ला देखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणार. म्हणजे वर्षोनुवर्षे हे निसर्ग २२ दिवस पुढे सरकलेलं असल्यामुळे हे भविष्यात असंच राहणार आहे, म्हणून हे आपण म्हणतो. निसर्गावर प्रेम करा, झाडं लावा; कारण की काय झालं, या वाढत्या तापमानामुळे सगळ्या गोष्टी ह्या घडत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं तापमान वाढत चालल्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, म्हणून भविष्यात झाडं लावणं गरजेचं आहे, झाडं लावून पृथ्वीचं तापमान कमी करा.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा