कर्जमाफी प्रक्रिया वेगाने सुरू; २०१९ च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांसाठीही मोठा निर्णय

कर्जमाफी प्रक्रिया वेगाने सुरू; २०१९च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील महत्वाचा निर्णय
राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. जूनअखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या योजनेचा राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत नियम २६० अंतर्गत चर्चेला उत्तर देताना दिली.
राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. जूनअखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतांश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या योजनेचा राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत नियम २६० अंतर्गत चर्चेला उत्तर देताना दिली.
राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक व सुलभ करण्यासाठी प्रशासनाने व्यापक डिजिटल यंत्रणा उभारली आहे. शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. यात अल्पमुदत, पुनर्गठित व पुनर्रचित कर्जाचा समावेश आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ तर २ लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी 'वन टाइम सेटलमेंट' योजना लागू केली आहे.
व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांना यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले असून थकीत कर्जदारांना पुन्हा कर्जपात्र बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. उर्वरित तक्रारी आणि मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री व सहकारमंत्री यांचा समावेश असलेला मंत्रिगटही काम करत आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.
पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्र युनिक क्रमांक
• पात्र शेतकऱ्याला स्वतंत्र युनिक क्रमांक देण्यात आला असून ऑनलाइन पोर्टलवर डेटा अपलोड केला आहे. लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत, जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी संस्थांमार्फत जाहीर केली जात आहे.
• शेतकऱ्यांनी युनिक क्रमांक, आधार प्रमाणीकरण व मोबाइल क्रमांक नोंदणी जवळील सेवा केंद्रात करणे आवश्यक आहे. यानंतर संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल.
• त्यानंतर बँकेमार्फत शेतकऱ्यांना संदेशाद्वारे कर्जमुक्तीची माहिती दिली जाईल, असे मंत्री म्हणाले.
२०१९ च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही देणार लाभ
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील १२.७१ लाख शेतकऱ्यांना राज्य सरकार दिलासा देणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उप समितीत याबाबत चर्चा झाली झाल आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री जाहीर करतील, अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत केली.