हवामान अंदाज: २० जूनपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; २२ जूनपासून राज्यात पेरणीयोग्य पाऊस!

हवामान अंदाज: २० जूनपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; २२ जूनपासून राज्यात पेरणीयोग्य पाऊस!
तारीख जी आहे, त्याच तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सून प्रवेश करतोय. पण आता तरी घाई करू नका, कारण की २० आणि २१ तारखेला त्याला पूर्ण महाराष्ट्र व्यापू द्या. २२ तारखेपासून पुढे पेरणीयोग्य वातावरण आहे. २० तारखेलाच वातावरण पूर्ण चेंज होऊन जाईल आणि निगेटिव्हिटी जी करतायत त्यांना एक विनंती आहे, मागचे अंदाज चेक करा, त्यामध्ये आणि आताच्या वातावरणामध्ये काय फरक आहे.
का? परिस्थिती जी आहे, ती सारखीच पेरणीची जी आहे, त्यामध्ये बदल नाही. पण बदल खूप होणार. २० आणि २१ ला दोन दिवस संध्याकाळपर्यंत धीर धरा. २२ पासून पुढे ज्या दोन दिवसांत जेवढा पाऊस पडेल, त्याच भागातील शेतकऱ्यांनी आपला जो काही पेरणीचा निर्णय आहे, तो तुमच्या वैयक्तिक निर्णयावरती घेऊ शकता. पण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या रविवारपासून खानदेशमध्ये सुद्धा, खानदेशला तर चार दिवस मराठवाड्यापेक्षा पण उशिरा सांगतोय; पण खानदेशमध्ये सुद्धा सुरुवात करणार आहे.
चांगली ओल जाऊ द्या, जे शासन निर्णय आहेत, त्या निर्णयाप्रमाणेच पेरण्या करा. आपल्या जो मी स्टार्टअप केला आहे आज सांगण्याचा, त्या स्टार्टअपमध्ये फक्त कसा पडणार आहे, किती पडणार आहे एवढंच सांगणार आहे; पेरणीचा सल्ला मात्र कोणाला देणार नाही, आणि दिला तरी तो कोणी घेऊ नका.
ज्या दोन दिवसांपूर्वी ज्या सॅटेलाइटवरती यांना ढग दिसत नव्हते, ढग गायब झाले होते, मान्सून महाराष्ट्रामध्ये आला आणि तारीख पुढे चालून खंड पडला, असा त्या खंडामध्ये सुद्धा ढग गायब होतात म्हणजे तो मान्सून नाहीये का? हा एक सरळ सरळ सल्ला आहे. मान्सूनला कमी दाबाचा पट्टा निर्माण लागतो, त्यावेळेसच तो पाऊस पडतो; आणि एक्झॅक्टली २० तारखेलाच अरबी समुद्रामध्ये मोठा कमी दाबाचा पट्टा बनतोय. त्यामुळे २० तारखेपासून पुढे महाराष्ट्रात प्रवेश करायला, महाराष्ट्र पूर्ण व्यापायला, याला जवळपास दोन दिवस तरी घेऊ शकतो. म्हणजे २० आणि २१ ला महाराष्ट्रामध्ये पावसाची जी काही सुरुवात आहे, ती होणार आहे.
२० तारीख काही भाग असे आहेत, तिथे स्थानिक स्वरूपासारखा पाऊस पडू शकतो, म्हणजे वळीव आहे पण पडू शकतो. त्यामध्ये बीड जिल्हा आहे, थोडेफार धाराशिवचे भाग आहेत, थोडेफार जालना, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगावमध्येही मोजक्या ठिकाणी उष्णतेमुळे हा पाऊस पडू शकतो. सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी पडू शकतो, बीडमध्ये काही ठिकाणी हा २० तारखेला सुरुवात करणार आहे. धुळे किंवा जळगावच्या पश्चिम भागात मेघगर्जनेसह पडू शकतो, पण व्याप्ती कमी आहे पहिल्या दिवशी; ही सुरुवात करणार आहे, त्यामुळे घाईगडबड करू नका. लातूरमध्येही उत्तरेकडील भागांना, परभणीमध्ये रात्रीच्या वेळेला, ही रात्रीच्या वेळेला सुरुवात करणारी कंडिशन आहे; पण २० च तारखेला तो सुरुवात करणार आहे.
