औषधी आणि सुगंधी वनस्पतींची शेती – आता मिळणार शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान!

25-06-2025

औषधी आणि सुगंधी वनस्पतींची शेती – आता मिळणार शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान!
शेअर करा

औषधी आणि सुगंधी वनस्पतींची शेती – आता मिळणार शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान!

शेतकरी बांधवांनो, पारंपरिक फळझाडांबरोबरच आता औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठीही सरकारकडून भरघोस अनुदान मिळू शकते! महाराष्ट्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत (MIDH) राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा आता तुम्हीही लाभ घेऊ शकता.

 

महत्वाचे वैशिष्ट्य – औषधी वनस्पतींसाठी अनुदान

सरकारकडून औषधी वनस्पती लागवडीसाठी प्रति हेक्टर ₹1,50,000 खर्च मापदंड ठरवला आहे. याअंतर्गत पुढीलप्रमाणे अर्थसाहाय्य दिले जाते:

• सर्वसाधारण क्षेत्र: ४०% अनुदान

• आदिवासी / अनुसूचित क्षेत्र: ५०% अनुदान

• अधिकतम क्षेत्र: २ हेक्टरपर्यंत

 

समाविष्ट औषधी वनस्पती:

अश्वगंधा, ब्राम्ही, ज्येष्ठमध, शतावरी, कुटकी, तुलसी, चिराटा, विदारीकंद, जटामासी, गुग्गूळ, पिंपळी, पुष्करमूळ आदी.

 

सुगंधी वनस्पतींसाठीही मिळणार अनुदान

बाजारमूल्य जास्त असलेल्या सुगंधी वनस्पतींना अनुदान देण्यात येते.

• लागवडीचा खर्च: ₹1,25,000 प्रति हेक्टर

• अनुदान प्रमाण:

- सर्वसाधारण क्षेत्र – ४०%

- अनुसूचित क्षेत्र – ५०%

• अधिकतम मर्यादा: २ हेक्टर

 

समाविष्ट सुगंधी वनस्पती:

गुलाब, जिरेनियम, चंदन, रोझमेरी, लॅव्हेंडर, निशिगंध, जाई, दवणा, कॅमोमाईल इत्यादी.

 

अर्ज प्रक्रिया – कशी कराल?

1. महाडीबीटी (Mahadbt) पोर्टलवर जा:

👉 https://mahadbt.maharashtra.gov.in

 

2. 'फलोत्पादन घटक' अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करा.

 

3. कागदपत्रे अपलोड करा:

• ७/१२ उतारा

• आधार कार्ड

• बँक पासबुक झेरॉक्स

• जातीचा दाखला (जर लागु असेल तर)

• कृषी ओळखपत्र (असल्यास)

• डिजिटल साइन असलेला अर्जाचा प्रिंट

 

शेतकऱ्यांसाठी संधी का आहे खास?

औषधी व सुगंधी वनस्पतींना सध्या बाजारात प्रचंड मागणी आहे.

कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्याचा उत्तम पर्याय.

सेंद्रिय व शाश्वत शेतीकडे जाण्याचा आदर्श मार्ग.

हे पण पहा : सोयाबीनने दाखवली ताकद! या राज्यात ठरला अव्वल, पहा सविस्तर माहिती..

औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, महाडीबीटी योजना, फलोत्पादन अनुदान, शेतकरी योजना, औषधी शेती, सुगंधी शेती

शेअर करा

संबंधित शेती विषयक माहिती

Loading

शॉप

Loading