पंजाब डख हवामान अंदाज (१३ जुलै): पावसाची उघडीप संपणार! १५ पासून पुन्हा पाऊस, विदर्भात मुसळधार

पंजाब डख हवामान अंदाज (१३ जुलै): पावसाची उघडीप संपणार! १५ पासून पुन्हा पाऊस, विदर्भात मुसळधार
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Sandip N Nakade

Published:

पंजाब डख यांचा सुधारित हवामान अंदाज: पावसाची विश्रांती संपणार आणि विदर्भासाठी मोठा अलर्ट (१३ जुलै २०२६)

 

गेल्या आठ दिवसांपासून (९ जुलैपासून) राज्यामध्ये पावसाने घेतलेली विश्रांती आता संपणार आहे. हवामान तज्ञ पंजाब डख यांनी १३ जुलै २०२६ रोजी आपला नवीन अंदाज वर्तवला असून, त्यानुसार राज्यात पुन्हा एकदा वरुणराजा सक्रिय होणार आहे. विशेषतः विदर्भ आणि आतापर्यंत पावसापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यांसाठी हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे.

 

१५ जुलैपासून पावसाला पुन्हा सुरुवात

  • १४ जुलै (उद्याचा दिवस): उद्या राज्यामध्ये हवामान कोरडेच राहील, परंतु १५ तारखेपासून राज्यात बऱ्याच भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे.

  • सलग पाऊस: १५ जुलैपासून सुरू झालेला पाऊस सलग ५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागांत दररोज पडत राहील. हा पाऊस एकाच जागी न पडता भाग बदलत पडेल.

  •  

  • मुंबई, पुणे, नाशिक: या भागांसह अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रात १५ तारखेला पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर पावसाचा जोर वाढत जाईल.

वंचित जिल्ह्यांना मिळणार 'जीवदान' ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि पेरण्या रखडल्या आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे:

 

  • सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, सांगली आणि नांदेड: या पट्ट्यामध्ये १५ तारखेला पावसाला सुरुवात होईल.

  • १९ तारखेनंतर: या सर्व जिल्ह्यांमध्ये १९ तारखेनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल.

  •  

  • पंढरपूर यात्रा: पंढरपूरची यात्रा परतल्यानंतर, म्हणजेच २७ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान सोलापूर जिल्ह्याकडे अतिशय जोराचा पाऊस राहील.

  •  

विदर्भासाठी मोठा अलर्ट: वरुणराजाची जोरदार बॅटिंग पंजाब डख यांनी विदर्भासाठी विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. जसा पाऊस मुंबई आणि कोकणात झाला, तशीच स्थिती आता विदर्भात पाहायला मिळेल:

 

  • २० जुलैनंतर विदर्भात मुसळधार: दोन लो प्रेशर (कमी दाबाचे क्षेत्र) प्रणाली विदर्भाकडे सरकत असल्यामुळे २० तारखेनंतर विदर्भात अतिशय जोराचा पाऊस पडणार आहे.

  •  

  • सतर्कतेचे जिल्हे: नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, वाशिम आणि हिंगोली.

  • यामध्ये प्रामुख्याने नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वाधिक असेल.

  •  

मराठवाडा आणि उर्वरित भाग

  • मराठवाडा: विदर्भाकडे चक्रीवादळ/कमी दाबाचे क्षेत्र फिरत असल्यामुळे मराठवाड्यामध्ये 'रिमझिम' स्वरूपाचा पाऊस राहील.

  • नंदुरबार: पावसामधून वंचित असलेल्या नंदुरबारमध्येही १५ तारखेला पाऊस सुरू होईल आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तेथेही जोराचा पाऊस पडेल.

शेतकरी बांधवांनी पावसाच्या या आगमनानुसार आपल्या रखडलेल्या पेरण्या आणि शेतीची कामे यांचे योग्य नियोजन करावे.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा