पंजाब डख हवामान अंदाज (२७ जुलै): जायकवाडी, उजनी धरणे भरणार! ३० जुलैपासून १५ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

पंजाब डख हवामान अंदाज (२७ जुलै): जायकवाडी, उजनी धरणे भरणार! ३० जुलैपासून १५ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Sandip N Nakade

Published:

पंजाब डख हवामान अंदाज: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, ३० जुलैपासून १५ जिल्ह्यांत मुसळधार! (२७ जुलै २०२६)

हवामान तज्ञ पंजाब डख यांनी आज २७ जुलै २०२६ रोजी राज्याचा नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, राज्यातील धरणे वेगाने भरत असून बळीराजासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात नव्याने तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ: जायकवाडी आणि उजनी धरण भरणार!

  • जायकवाडी धरण (नाथसागर): मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण आज सकाळी ५४% भरले आहे. गोदावरीपात्रात पाण्याची आवक वेगाने सुरू असल्याने उद्यापर्यंत हे धरण ६२% होईल. तसेच ५ ऑगस्टपर्यंत जायकवाडी धरण तब्बल ७० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

  • उजनी धरण: उजनी धरण सध्या ८५% च्या पुढे गेले असून, या पावसात ते १००% भरणार असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे. यामुळे उजनीच्या लाभधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  •  

पावसाचा विभागनिहाय अंदाज:

  • २७, २८ आणि २९ जुलैचा अंदाज: जे जिल्हे पावसापासून वंचित होते (उदा. सोलापूर, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव), तिथे आजपासून २९ तारखेपर्यंत दुपारपर्यंत ऊन पडेल आणि अडीच-तीन वाजेनंतर अर्ध्या ते एक तासाचा जोराचा पाऊस पडेल. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर आणि मंद्रुप परिसरातही चांगली हजेरी राहील.

  •  

  • ३० जुलै ते १ ऑगस्ट (चक्रीवादळाचा परिणाम): बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे २९ तारखेला तो नागपूरकडे येईल. यामुळे ३०, ३१ जुलै आणि १ ऑगस्ट दरम्यान विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १५ ते १६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल.

    • विदर्भ: नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा.

    • उत्तर महाराष्ट्र (खानदेश): जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक (त्र्यंबकेश्वर, मालेगाव).

    • मराठवाडा: परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर.

    •  

शेतकऱ्यांसाठी खास सूचना: जालना जिल्ह्यातील (भोकरदन, सिल्लोड, राजूर, जाफराबाद) ज्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात विहिरीचे पाणी उपसले होते, त्यांच्यासाठी हा पाऊस वरदान ठरणार आहे. ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान या भागात चांगला पाऊस होऊन विहिरी आणि ओढे-नाले भरतील.

 

पुढील महिन्यांचा अंदाज: १५ ते ३० ऑगस्ट दरम्यान राज्यात आणखी एक मोठे चक्रीवादळ येण्याची शक्यता असून संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल. तसेच, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालेल आणि सर्व तळे भरतील. १३ नोव्हेंबरपासून राज्यात थंडीला सुरुवात होईल.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा