हवामान अंदाज: २० जूनपर्यंत वारे शांत होणार; जूनच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात सर्रास पेरण्या!

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

हवामान अंदाज: २० जूनपर्यंत वारे शांत होणार; जूनच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात सर्रास पेरण्या!

नमस्कार मी पंजाब डख, आज आहे १६ जून २०२६. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले आणि म्हणाले की हे जे वारे आहेत ते कधी बंद होतील? तर सर्वप्रथम हे वारे कधी बंद होणार त्याबद्दल अगोदर खुलासा करणार आहे.

 

तर काही ठिकाणी १८ तारखेला वारे बंद होईल, काही ठिकाणी १९ जूनला बंद होईल, काही ठिकाणी २० जूनला बंद होईल आणि काही ठिकाणी २१ जूनला वारे बंद होईल. जिथं समजा लवकर १९ जूनला बंद झालं, तिथं लवकर पाऊस येईल. २० जूनला झालं, त्याच्या दोन दिवसांनी तिथं पाऊस म्हणजेच उशिरा येईल. पण वारे मात्र २० जूनपर्यंत बंद होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. २० जूनच्या नंतर तापमान देखील, उष्णतेची लाट देखील कमी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.

 

आणि राहिला प्रश्न आता, परत शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे, खरंच दुष्काळ पडणार आहे का? तर सर्व शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगतो, दुष्काळ हे मनातला काढून टाका, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहेत एवढं मी सांगू इच्छितो. काही जणांच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले, तर १० जुलै ते १५ जुलैमध्ये पेरण्या होतील. पण शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार एवढं निश्चित आहे. कारण की जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला राज्यात पाऊस येणार आहे आणि तो पाऊस काय होणार आहे, विदर्भाकडून येणार आहे.

 

काय असतं माहितीये का, तुम्हाला सांगू इच्छितो, की मान्सून केरळमधून दाखल झाल्याच्यानंतर पुढे सरकल्याच्यानंतर महाराष्ट्रात दाखल झाला. आणि त्याच्यानंतर स्थिरावला, आणि असं उभं वारे सुटलं, की काय होतं मग पाऊस काय होतो, मग पूर्वेकडूनच पाऊस येतो. मग परत काय होतं ते इकडून पाऊस येतो, मग पूर्वेकडून पावसाला सुरुवात होते. मग पूर्वेकडून म्हणजे कोणतं येतो, विदर्भ आणि इकडून तेलंगणाकडून. मग तिकडून पाऊस येणार आणि महाराष्ट्रातल्या परत शेतकऱ्याच्या पेरण्या लागणार, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र सगळ्यांच्या पेरण्या लागतील, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.

पेरणी करताना सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सगळ्यांची पेरणी एकदम होणार नाही. काही ठिकाणी २१ जूनला पाऊस पडेल, कुठे २२ ला पडेल, कुठे २३ ला पडेल. काही भागात २४ ला जाईल, कुठे २५ ला जाईल, कुठे २६ जूनला पडेल. काही ठिकाणी २७, २८, २९, ३०, काही ठिकाणी १ जुलैला पडेल, कुठे २ जुलैला. तर काही ठिकाणी १ जुलै, २ जुलैपर्यंत पाऊस पडेल, म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण पेरण्या मात्र सगळ्यांच्या सर्रास शेतकऱ्यांच्या होणार, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.

 

सर्वप्रथम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्या विदर्भामध्ये काय होणार, पूर्व विदर्भ. म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ... आमच्या इकडे काय होईल, तिथं पाऊस येईल. तिथं पाऊस पडल्याच्यानंतर मग तो मराठवाड्याकडे जाईल. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल. आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे. उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, २३-२४ जूनच्या नंतर मग तिकडे देखील चांगला पाऊस पडेल. २३ ते ३0 मात्र उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पाऊस पडेल.

 

मुंबईला देखील चांगला पाऊस पडणार आहे या शेवटच्या आठवड्यात, म्हणून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबईला तर मुसळधार पाऊस पडेल. पुन्याकडे (पुण्याकडे) देखील पडेल, कोकणात देखील पडणार आहे. मुंबईला काही ठिकाणी म्हणजेच पहिलाच पाऊस असा पडेल की, म्हणजे चांगला मुसळधार, अतिवृष्टीसारखा मुंबईला देखील पाऊस पडेल. म्हणून हे देखील मुंबईकरांनी अंदाज लक्षात घ्यायचा. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला देखील पाऊस राहील, पुण्याला देखील राहील, कोकण घाट माथ्यावर देखील चांगला पाऊस पडेल. पण पाऊस येणार आहे, शेवटच्या आठवड्यात येणार आहे.

 

सर्वप्रथम मी पहिल्यापासूनच काय म्हणालो होतो, की निसर्ग... निसर्गाकडे, झाडांकडे कोणी लक्ष देत नाही. तुम्हाला सांगतो, वाढत्या तापमानामुळे काय झालं, निसर्ग २२ दिवस पुढे सरकला. उन्हाळा २२ दिवस पुढे सरकला, पावसाळा २२ दिवस पुढे सरकला आणि हिवाळा २२ दिवस पुढे सरकला. दरवर्षी ७ जूनला पाऊस येतो ना, मग त्या ७ जूनमध्ये २२ मिसळा ना, मग किती व्हायलेत? दरवर्षी २५, २६, २७, २८ जूनला महाराष्ट्रात पेरण्या लागतील, म्हणून हे वर्षोनुवर्षाचा अंदाज लक्षात घ्या.

 

आता पुढच्या वर्षी २०२७ ला देखील अशीच परिस्थिती राहणार. २०२७ ला देखील काय होणार, जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पेरण्या होणार. २८ ला देखील अशीच परिस्थिती राहणार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणार. २०२९ ला देखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणार. म्हणजे वर्षोनुवर्षे हे निसर्ग २२ दिवस पुढे सरकलेलं असल्यामुळे हे भविष्यात असंच राहणार आहे, म्हणून हे आपण म्हणतो. निसर्गावर प्रेम करा, झाडं लावा; कारण की काय झालं, या वाढत्या तापमानामुळे सगळ्या गोष्टी ह्या घडत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं तापमान वाढत चालल्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, म्हणून भविष्यात झाडं लावणं गरजेचं आहे, झाडं लावून पृथ्वीचं तापमान कमी करा.

 

शेतकऱ्याला परत सांगतो की शेतकऱ्यांनो घाबरू नका. हे तुम्ही जर मोबाईल उघडला की तुम्हाला ते एल निनो नाव दिसायला लागलंय. तुम्हाला सांगतो, आता तुम्ही वाटल्यास ना ते पेरू देश आहे तिथे तिथल्या समुद्राचं तापमान करा, तिथून खाल्ली (खाली) चालू खालच्या भागातलं तापमान करा. खालच्या भागामध्ये थंडी आणि वरती देखील एवढं काही एल निनो वगैरे काही नाही. तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि तुम्हाला सांगतो पाऊस नाही पडायला लागला की हे एल निनो... आता याच्यानंतर तुम्ही बघा २० तारखेच्या नंतर, हे सगळे एल निनो पाऊस सुरू झाला की एल निनो हे सगळं बंद करून टाकतील. म्हणतात एल निनो बंद झाला म्हणतात.

तुम्हाला सांगतो, हे सगळं काही नसतं. दोन समुद्र आहेत भारताला, दोन समुद्र आहेत; अरबी समुद्र, बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रातलं जरी पाऊस नाही आला, तरी बंगालच्या खाडीचा पाऊस येतो आणि आपल्या भारताला पाऊस पडतो, म्हणून म्हणतो पाऊस येणार आहे निश्चित आणि पेरण्या होणार आहेत. आणि यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार आहे, परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या.