हवामान अंदाज: २१ ते ३० जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पाऊस; जाणून घ्या पेरणीचे अचूक नियोजन

हवामान अंदाज: २१ ते ३० जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पाऊस; जाणून घ्या पेरणीचे अचूक नियोजन
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Sandip N Nakade

Published:

हवामान अंदाज: २१ ते ३० जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पाऊस; जाणून घ्या पेरणीचे अचूक नियोजन

 

नमस्कार मी पंजाब डख, आज आहे १८ जून २०२६. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की २१ जूनपासून ते ३० जूनच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे. बऱ्याच ठिकाणी २१ तारखेला पाऊस सुरू होणार आहे, काही ठिकाणी २२ ला होईल. असं करत करत ३० तारखेपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. आणि शेतकऱ्यासाठी हा दिलासादायक पाऊस ठरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजेच सांगायचं झालं तर २१ जूनपासून ते ३० जूनच्या दरम्यान राज्यात चांगला पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे. तो पाऊस सगळीकडे एकाच दिवसात सगळीकडे जाणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.

 

आणि शेतकऱ्याला एक विनंती आहे की जमिनीमध्ये, पेरणी करत असताना जमिनीमध्ये ओल तपासून पेरणी करावी. कारण की चार बोट, सहा बोटवर जर तुम्ही पेरणी केली, तर ती तुमची पेरणी खराब होऊ शकते. म्हणून पेरणी करत असताना जमिनीतली सगळ्यात महत्त्वाचं ओल तपासणं. आणि त्याच्यानंतर सांगू इच्छितो की पेरणीसाठी आता उशीर झाला, तर उशीर झाल्याच्या मध्ये जर कापूस लागवड करत असाल, तर सगळ्यात महत्त्वाचं आता अंतर कमी करावं लागतं. कारण की अंतर कमी केल्याच्यानंतरच मग कापसाला उतार येतो, म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे उशीर... कापसाचं अंतर, उशिरा जर पेरणी झाली तर अंतर जवळ करावं लागतं. आणि लवकर पेरणी असेल तर थोडं अंतर वाढवावं लागतं, म्हणून काय म्हणतोय ॲव्हरेजमध्ये चांगले येतात. पण कोणतीही पेरणी करत असताना उशिरा झाली तर त्याचं अंतर कमीच करावं लागणार आहे. कारण की उशिरा पेरणी केल्यामुळे वाढ होत नसते, म्हणून हे लक्षात घ्यायचं.

 

आणि होय तोपर्यंत लवकर येणाऱ्या जाती करा. पांढऱ्या फुलाच्या करा, लवकर येणाऱ्या करा. कारण की लवकर येणाऱ्यांमध्येच काहीतरी खरे आहे, नाहीतर उशीर येणाऱ्यांचे काही खरे नाही. म्हणून लवकरात लवकर येणाऱ्या जाती करा. आणि शेतीचं नियोजन करत असताना चांगली मशागत करून आपण आपल्या पेरणीची तयारी ठेवा. पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये ओल तपासा, अन असं करीत करीत नियोजन करून तुम्ही शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी ठेवा.

 

परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो, की यावर्षी... दरवर्षी मी म्हणतो ना, जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पेरण्या होणार आहेत. हे मी पहिल्यापासून सांगतोय की निसर्ग २२ दिवस पुढे सरकला आहे, पण याकडे कोणी दुर्लक्ष करतात. लोक अंदाज देत असताना निसर्गाकडे कोणी लक्ष देईना. निसर्ग काय झालं, हे ऋतूचक्र म्हणा २२ दिवस पुढे सरकलं आहे. थंडी २२ दिवस पुढे सरकली, उन्हाळा २२ दिवस पुढे सरकला आणि पावसाळा २२ दिवस पुढे सरकला. लहान मुलाला जरी विचारलं तर पाऊस कधी येणार, तो म्हणतो ७ जूनला येणार. पण आता भविष्यामध्ये काय करावं लागणार आहे, आता ७ जून ऐवजी आपल्याला दरवर्षी म्हणावं लागणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे आणि पेरणी होणार आहे, असं म्हणावं लागणार आहे.

 

यापुढे ही परिस्थिती अशीच राहणार आहे. पाऊस दरवर्षी ७ जूनला येणारच नाही, फक्त थोड्या भागात पडेल. पण खरी पेरणी मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा