पंजाब डख हवामान अंदाज: अहिल्यानगर व पारनेरमध्ये पुढील ३ दिवस हलका पाऊस, ९ ऑगस्टपासून हवामान कोरडे!

अहिल्यानगर व पारनेर हवामान अपडेट: पुढील ३ दिवस हलका पाऊस, ९ ऑगस्टपासून कडक ऊन! (७ ऑगस्ट २०२६)
हवामान तज्ञ पंजाब डख यांनी पारनेर कॉलेज (अहिल्यानगर) येथे आयोजित शेतकरी चर्चासत्रादरम्यान महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्याचा विशेष हवामान अंदाज जाहीर केला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असताना, या अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील ३ दिवस हवामान कसे असेल?
आज ७ ऑगस्टपासून पुढील तीन दिवस (७, ८ आणि ९ ऑगस्ट) अहिल्यानगर जिल्हा आणि पारनेर तालुक्यात १० ते ५ मिनिटांच्या कालावधीत हलका रिमझिम आणि विखुरलेला पाऊस सुरू राहील.
हा पाऊस खूप मोठा नसून केवळ हलक्या सरींच्या स्वरूपात असणार आहे.
९ ऑगस्टपासून कडक ऊन आणि सूर्यदर्शन:
येत्या ९ ऑगस्टनंतर जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णपणे कमी होऊन कडक ऊन पडेल आणि लख्ख सूर्यदर्शन होईल.
८ ऑगस्टपासूनच राज्यातील हवामान कोरडे होत जाणार असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी मोकळीक मिळणार आहे.
परतीचा पाऊस ठरणार वरदान:
पारनेर आणि अहिल्यानगर परिसरातील शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही; कारण आगामी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस जोरदार बरसणार आहे.
या परतींच्या पावसामुळे पारनेर तालुक्यातील राहिलेली छोटी-मोठी तळी आणि पाणलोट क्षेत्र १००% भरून जातील, ज्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
