PM Kisan Scheme: 19वा हप्ता लवकरच; तारीख केली जाहीर
17-12-2024
PM Kisan Scheme: 19वा हप्ता लवकरच; तारीख केली जाहीर
PM Kisan e-KYC: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक लाभार्थी अद्याप कागदपत्रांची पूर्तता न केल्याने वंचित राहू शकतात. जिल्ह्यातील सुमारे 20,798 शेतकरी या हप्त्यापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित करून ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे,
हप्ता वितरणाची शक्यता: कृषी विभागाच्या माहितीनुसार, केंद्र सरकार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पी. एम. किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित करणार आहे. योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी 6 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत ई-केवायसी प्रमाणीकरण आणि स्वयंनोंदणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.
ई-केवायसी कसे करावे?
ई-केवायसी अद्याप प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या सामाईक सुविधा केंद्रात जाऊन अंगठा स्कॅन करावा किंवा ग्रामस्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने चेहरा स्कॅन करून प्रमाणीकरण पूर्ण करावे. मोबाईलवर PM Kisan Face Authentication अॅप किंवा सुविधा केंद्राचा पर्याय निवडून शेतकऱ्यांनी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.
आवश्यक बाबी आणि नोंदणी:
शेतकऱ्यांना ई-केवायसीसोबत खालील बाबीही पूर्ण करणे गरजेचे आहे:
हे पण पहा : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती : १ जानेवारीपासून विनाहमी कर्ज मर्यादा २ लाख रुपये
योजनेसाठी नव्याने नोंदणी
बँक खाती आधार क्रमांकास जोडणे
भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे
बँक खाते आणि डीबीटी:
ज्यांचे बँक खाती अद्याप आधारशी लिंक नाहीत, त्यांनी त्वरित आधार अपडेट करून बँकेला भेट द्यावी आणि खात्याला DBT-Enabled करून घ्यावे. याशिवाय, जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन Indian Post Payment Bank खाते उघडून आधार संलग्नता करणेही शक्य आहे.
भूमिअभिलेख नोंदी:
शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख अद्याप लँड शेडिंग प्रलंबित असल्यास, त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक अद्ययावत प्रक्रिया पूर्ण करावी.
कृषी विभागाकडून या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील.
हे पण पहा : ई-पीक पाहणी करताना ही अट पूर्ण करावी लागणार, पहा महत्त्वाची अट कोणती…