डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते अधिक फळधारणा...

डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते अधिक फळधारणा...
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Suraj Ghodke (null)

Published:

डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते अधिक फळधारणा...

उष्ण व समशितोष्ण भागात डाळिंब हे वर्षभर फळधारणा होणारे झाड आहे. परंतु हे पाण्याच्या उपलब्धतेवरही अवलंबून असल्याने पावसाळ्यातला बहार (फुलधारणा) मे-जुन मध्ये घेतला जातो त्याला मृग बहार म्हणतात.

हिवाळ्यातला बहार सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये घेतला जातो त्याला हस्त बहार म्हणतात. उन्हाळ्यातला बहार (फुलधारणा) जाने-फेब्रुवारी मध्ये घेतला जातो त्याला अंबिया बहार म्हणतात. ज्या बागा तेलकट डाग रोगग्रस्त भागात असतील त्या बागेत किमान २ ते ३ वर्षे हस्त बहार घ्यावा.

जर आपल्या बागेत काही गंभीर समस्या नसतील तर पावसाळ्यामधील हंगाम (मृग बहार) आणि उशिराचा अंबिया बहारामध्ये चांगली फुल व फळधारणा होते, त्याबरोबर उच्च गुणवत्ता व भरपुर फळ संख्या असते म्हणून अधिक किंमत मिळून, भरपुर नफा मिळवता येऊ शकतो.

असे असले तरीही हस्त बहारातील पिक हे चांगले असते कारण; तेव्हा किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो; त्यामुळे फवारण्यांची संख्या कमी होते, चांगला रंग व गोडी येते कधी कधी उशीराच्या पावसामुळे (ऑक्टोबर) हस्त बहारातील फुलधारणा उशीरा होते.

त्यामुळे फळे तोडणीही उशिरा (मार्च मध्ये) होते त्याचा परिणाम मिळणाऱ्या बाजार भावात होतो. यंदा ३ वर्षाचा कल विचारात घेता सप्टेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये डाळिंबाचा बाजारभाव कमी झालेला असतो, कारण हा फळ तोडणीचा महत्वाचा कालावधी असतो.

अशा क्षेत्रामध्ये बहुतेकदा फेब्रुवारी ते ऑगस्ट कालावधी मध्ये चांगला भाव मिळतो. म्हणून, स्थानिक हवामान व बाजारभाव यानुसार फुलधारणेच्या हंगांमाचा निर्णय घेणे योग्य राहील. निर्यातीसाठी उशिराचा मृग बहार आणि हस्त बहारास प्राधान्य द्यावे.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा