राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत मोठा निर्णय

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत मोठा निर्णय
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Krushi Kranti Editorial Desk

Published:

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत मोठा निर्णय

शेतकऱ्यांना आतापर्यंत नेहमीच रात्रीची वीज देण्यात येत होती. यामुळे दिवसभर काबाडकष्ट करून शेतीला पाणी देण्यासाठी रात्रभर जाग राहावं लागत होते. यामुळे अनेकदा याबाबत मागणी देखील केली गेली आहे.

असे असताना आता आता राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांची ही डोकेदुखी कमी होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणं शक्य होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांना दिवसभर वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने 2019 मध्ये या योजनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात केली होती. या योजनेचा उद्देश 2023 पर्यंत एक लाख कृषी पंप बसवण्याचा होता. बैठकीत पुढचा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास आठ हजार मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. त्यासाठी बारा ते तेरा हजार मेगावॅटचे प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. तसेच उपकेंद्रांसाठी शेतकऱ्यांची जमीनी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
 

source : krishijagran

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा