हवामान अंदाज: २२ जूनपासून राज्यात पाऊस आणखी वाढणार; ५ जुलैपर्यंत सर्वत्र पेरण्यांची धूम!

हवामान अंदाज: २२ जूनपासून राज्यात पाऊस आणखी वाढणार; ५ जुलैपर्यंत सर्वत्र पेरण्यांची धूम!
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Sandip N Nakade

Published:

पंजाब डख हवामान अंदाज २२ जून २०२६ | महाराष्ट्र पेरणी पाऊस अपडेट

 

नमस्कार मी पंजाब डख, आज आहे २२ जून २०२६ आणि मी आहे करंजी घाटामध्ये. म्हणजे इथून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करंजी घाटामध्ये आणि या ठिकाणाहून खास करून अहिल्यानगरच्या या करंजी घाटातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. कारण की त्यांचे फोन आले की आमच्या भागामध्ये पुण्याकडे पाऊस सुरू झाला, आमच्याकडे अद्याप आला नाही. तर या करंजी घाटातल्या संपूर्ण भागातल्या शेतकऱ्याला, पाथर्डी तालुक्यातल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज २२ जूनला, म्हणजे आज रात्रीच्याला, तुमच्या भागामध्ये चांगला जोराचा पाऊस सुरू होणार आहे. आजपासून चांगला जवळपास ५ जुलैपर्यंत चांगला पाऊस बरसणार आहे. आणि तुमच्या इकडे जे छोटे-छोटे तळे आहेत, त्याच्यात देखील पाणी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तुमच्या भागात दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा.

 

पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण Maharashtra, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा, सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज २२ जूनपासून, मी म्हटलो होतो ना काल २१ ला पाऊस सुरू होईल, तर २१ ला पुणे, नाशिक, सातारा, बऱ्याच भागांमध्ये, मुंबई, सगळीकडे पाऊस सुरू झाला. संभाजीनगरकडे देखील आता देखील जाफ्राबादला पडला. पण आता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज २२ जूनपासून, आजपासून राज्यातला पाऊस आणखीन वाढत जाणार आहे. २२ ला, २३, २४, २५ असं करत करत ५ जुलैपर्यंत सगळ्या राज्यभर पाऊस पडणार आहे आणि सगळ्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहेत, म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.

 

राज्यात ठीकठिकाणी, म्हणजे आज २२ जूनपासून ते जवळपास ५ जुलैपर्यंत सगीकडे पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होतील, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. आणि सर्वप्रथम आनंदाची बातमी आणखीन सांगू इच्छितो की जुलैच्या, म्हणजे २ जुलै ते २० जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पुणे जिल्हा, त्याच्यानंतर कोकण पट्टी, त्याच्यानंतर मुंबई, उत्तर महाराष्ट्राकडे अतिवृष्टी होईल. मग त्या अतिवृष्टी झाल्यामुळे जे कॅचमेंट एरियातले धरणे आहेत, जायकवाडी धरण, त्याच्यात देखील पाणी यायला सुरुवात होईल. इकडे पुण्याकडे पडल्यामुळे तिकडे कोयना धरणाकडे देखील पाणी यायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा.

 

आज दुपारनंतर जे पाऊस सुरू होणार आहे २२ जूनला, तर तुम्हाला सांगू इच्छितो आज लगेच काय होणार सगळीकडे, महाराष्ट्रामध्ये काय होणार, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी, त्याच्यानंतर इकडे मराठवाड्याकडे देखील येणार, विदर्भाकडे देखील येणार आहे. म्हणजे जवळपास आज बराच भाग जवळपास व्यापून टाकणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आजच्या पेक्षा आणखीन उद्या २३ तारखेला आणखीन, २३ जूनला आणखीन बराच भागामध्ये व्यापून टाकणार आहे; २४ ला, २५ असं करत करत सगळीकडे वाढणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर, विदर्भामध्ये सांगायचं झालं तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा, अमरावती, ह्या परिसरात देखील म्हणजे आजपासून पावसाला वाढायला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. विदर्भात मात्र २३, २४, २५, २६, २७ च्या दरम्यान चांगला पाऊस बरसणार आहे आणि त्या शेतकऱ्यांचे देखील पेरणी होणार आहे, म्हणून विदर्भातल्या ११ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा.

 

मराठवाड्यात देखील आज बऱ्याच भागांमध्ये, म्हणजे परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, आज देखील बऱ्याच भागांमध्ये पाऊस दाखल होईल, पण उद्याच्याला आणखीन ह्या पाच-सात दिवसांमध्ये मात्र सगळीकडे दाखल होऊन मराठवाड्यातल्या देखील शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होतील, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.

त्याच्यानंतर सातारा जिल्हा झाला, सांगली झाला, सोलापूर, कोल्हापूर, तिकडे तर कालच पाऊस सुरू झालाय पण तिकडे आज देखील बराच भाग कव्हर होणार आहे. आणखीन १० दिवसांमध्ये तिकडे देखील सगळीकडे पाऊस पडेल आणि त्या भागातील देखील शेतकऱ्यांच्या पेरण्या लागू होतील, म्हणून हे लक्षात घ्यायचं.

 

उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, ह्या परिसरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या देखील आज म्हणजे २२पासून ते ५ जुलैपर्यंत तुमचीकडे सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या लागतील, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.

 

शेतकऱ्याला ही विनंती, शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये ईतभर ओल गेली, तर तुम्ही कधी पेरणी करू शकता, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. चार-सहा बोटावर जर ओल गेली तर तुमची पेरणी खराब होते, त्याच्यामुळे चार-सहा बोटावर पेरणी करू नये. ईतभर चांगली ओल गेल्यानंतर तुम्ही पेरणी कधी करू शकता, म्हणून ही शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं.

 

पण राज्यात मात्र आजपासून परत जास्त पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, परत एकदा सांगतो. जूनमध्ये यावर्षी मी म्हटलं होतं ना कमी पाऊस राहणार; जुलैमध्ये जास्त, ऑगस्टला कमी, आणि सप्टेंबर-ऑक्टोबर परतीचा पाऊस धमाकूळ घालणार आहे, म्हणून हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा. पण जुलै महिन्यामध्ये मात्र राज्यामध्ये ठीकठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्वप्रथमतः लक्षात घ्यायचा. परत कोणत्या कोणत्या भागात होणार आहे, त्याचा सविस्तर अंदाज पुढच्या अंदाजात दिला जाईल. धन्यवाद।

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा