पंजाब डख हवामान अंदाज 23 जून 2026 | 30 जूनपर्यंत महाराष्ट्रात पेरणीयोग्य पावसाचा अंदाज

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

पंजाब डख हवामान अंदाज 23 जून 2026 | 30 जूनपर्यंत महाराष्ट्रात पेरणीयोग्य पावसाचा अंदाज

पंजाब डख हवामान अंदाज 23 जून 2026 | महाराष्ट्रात 30 जूनपर्यंत पेरणीयोग्य पाऊस, जुलैमध्ये जोरदार पावसाची शक्यता

 

नमस्कार मी पंजाब डख, आज आहे २३ जून २०२६. मी म्हटलं होतं ना २१ ला पाऊस सुरुवात होईल, २२ ला आणखीन वाढेल, आणि २३ आज आहे, तर आज देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागांमध्ये पाऊस व्याप्ती वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर २४, २५, २६ असं करत करत २७, २८, ३० तारखेपर्यंत राज्यात बऱ्याच भागांमध्ये पाऊस जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी चांगला पेरणीयोग्य होईल, त्या शेतकऱ्यांनी पेरणी करायला हरकत नाही, पण जमिनीमध्ये ईतभर ओल जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.

 

आता राज्यात आज आहे २३ जून २०२६, तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज देखील सुरुवात काय होणार आहे, म्हणजे कोकणपट्टीहून. आज कोकणपट्टीहून पाऊस सुरू झाल्याच्या नंतर घाटमाथ्यावर सुरू होईल, मग त्याच्यानंतर तो पाऊस आज पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर मुंबई, नाशिक, इगतपुरी, त्याच्यानंतर नाशिकला जाईल, पुन्हा आज नंदुरबारकडे काही जिल्ह्यांमध्ये हाजिरी लावेल, धुळे जिल्ह्यात हाजिरी लावेल, जळगाव जिल्ह्यात लावेल, त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी हाजिरी लावेल, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हाजिरी लावेल, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये तुळक भागात हाजिरी लावेल, लातूर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच भागात हाजिरी लावेल.

 

परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली, वाशीम, ह्या पट्ट्यात देखील आज बऱ्याच भागामध्ये, बराच भाग कव्हर केलेला दिसेल, म्हणजे सर्व दूर नाही पडणार, पण दररोज वेगवेगळ्या भागात हाजिरी लावून पाऊस, म्हणून हे लक्षात घ्यायचं.

 

त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, तिकडे बऱ्याच भागांमध्ये पाऊस सुरू आहे, आणि आज देखील तिकडल्या भागात होणार आहे, त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भ आणि पूर्व विदर्भ, जमिनीमध्ये ओल ही पुरेशी गेली, तर मग तुम्ही पेरणी करायला हरकत नाही, पण कमी ओल असली तर पेरणी करू नका, कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, सध्या आणखीन जवळपास ना, हे तर ३० जून पर्यंत पाऊस आहेच, पण त्याच्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील चांगला पाऊस बरसणार आहे, म्हणजे चांगला पाऊस होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. जूनपेक्षा जुलैमध्ये जरा जास्त पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सगळ्यात लक्षात घ्यायचा.

 

आज देखील बघा, बऱ्याच भागात ठीकठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. काल देखील खूप ठिकाणी झाला, म्हणजे काल अहिल्यानगर झाला, जुन्नर, सिन्नर तिकडे झाला, त्याच्यानंतर नाशिककडे झाला, मुंबईकडे झाला, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात झाला, वाशीम कडे झाला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया तिकडे देखील झाला, नांदेड जिल्ह्यात काही भागात झाला, त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात झाला, संभाजीनगरकडे झाला, शिर्डी, कोपरगाव, राहाता, बऱ्याच परिसरात. असाच काय होणार आहे, दररोज आणखीन ह्या आठ दिवसांमध्ये सगळीकडे पाऊस पडणार नाही, जिथं नाही, ज्या भागात नाही गेला, तिथं ह्या चार-पाच दिवसात सगळीकडे पोहचेल, पण सगळ्याला मात्र पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि जुलैच्या म्हणजे पहिल्या वीक मध्ये पहिल्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं.

 

त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, त्या शेतकऱ्यांचे फोन आले धाराशिवच्या, तिकडे देखील काय होणार आहे २६-२७ च्या नंतर तिकडे देखील त्या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे. कर्नाटक मध्ये देखील पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.

 

आता हे तुम्हाला सांगू इच्छितो, हे आता म्हणजे आज २३ जून पासून ते ३० पर्यंत बऱ्याच भागामध्ये चांगला पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे, जिथं पडला, तिथं त्याच्यानंतर जास्त पडणार आहे. आणि सगळ्यांचे पेरणीयोग्य पाऊस राहील, ओल असली तर पेरणी करायला हरकत नाही. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र चांगला म्हणजे एक लो प्रेशर तयार होईल आणि त्याचे चक्रवाढात रूपांतर झाल्याच्या नंतर ते महाराष्ट्राच्या दिशेने येईल, त्याच्यामुळे जुलै महिन्यात जरा जास्त पाऊस राहणार, म्हणजे २ जुलै ते २० जुलैच्या दरम्यान म्हणजे राज्यामध्ये जुलै महिन्यात चांगला पाऊस राहील आणि त्याच्यामध्ये काय होईल, जे छोटे-छोटे तळे आहेत राज्यातले, पाणी साठवण तलाव, त्याच्यात देखील पाणी येईल.

 

नाशिककडे उत्तर महाराष्ट्राकडे देखील काय होणार आहे, तिकडे देखील मुंबई, पुणे घाटमाथ्यावर कोकणात पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे काय होईल त्या परिसरातले जे छोटे-छोटे जे धरणे आहेत, धरणं आहेत छोटे-छोटे तळे, साठवण तलाव, पाणी पाझर तलाव, त्या तळ्यामध्ये चांगल्या जुलैच्या मध्ये मात्र चांगला त्या तळ्यामध्ये पाणी येईल आणि त्या भागातील पाणी टंचाईचे जे सावट आहे, ते मात्र कमी होऊन जाईल, म्हणून हे जुलै महिन्यातला अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.

 

जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला, ऑगस्टमध्ये दोन पावसाचे चांगले होणार आहेत, म्हणजे सर्वदूरचे दोनच होणार, पण जूनमध्ये मात्र चांगले तीन-चार होते. आणि त्याच्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर परतीचे पाऊस जास्त होतील, म्हणून यावर्षी पिकाला लागेल तसा पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे, पण काही काही भागात जास्त होणार आहे. काल देखील बऱ्याच भागांमध्ये ओढे-नाले वाहायला पाऊस पडला, तसं आज देखील बऱ्याच भागांमध्ये तशी परिस्थिती राहणार आहे. एकदम सगळीकडेच जास्त पडणार नाही, पण काय होणार आहे, दररोज वेगवेगळ्या भाग कव्हर कव्हर करीत असा सगळीकडे पाऊस पडणार आहे, एकदम.

 

शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, फक्त काय करा पेरणी करत असताना एक लक्षात घ्यायचं, जमिनीमध्ये चांगली ईतभर ओल असेल, तर पेरणीचा निर्णय घ्यायचा, नसता मग पेरणीचा निर्णय घेऊ नये, कारण की पाऊस तर पडणार आहे, पाऊस येणार आहे, म्हणून फक्त पाऊस सगळीकडे एकदा येणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात जाणार आहे आणि सगळ्यांची पेरणीयोग्य पाऊस राहील.

 

पाऊस यावर्षी थोडा कमी राहील, पण परतीचा, परतीचा पाऊस चांगला पडणार, जुलैमध्ये जास्त पडणार, सप्टेंबर-ऑक्टोबर जास्त पडणार, पण पिके चांगले येणार, म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. अचानक वातावरण बदललं तर लगेच एक मेसेज दिला जाईल, धन्यवाद.