हवामान अंदाज: ३ ते ८ जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टी; गोदावरी नदीला महापुराचा धोका!

हवामान अंदाज: ३ ते ८ जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टी; गोदावरी नदीला महापुराचा धोका!
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Sandip N Nakade

Published:

३ ते ८ जुलै २०२६: मान्सूनचा 'हाय अलर्ट' आणि शेतीचे नियोजन

 

१. पावसाचा जोर आणि अतिवृष्टीचे क्षेत्र: हवामान अभ्यासक पंजाब डक यांच्या ताज्या अंदाजानुसार, ३ जुलै ते ८ जुलै हा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या आठ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता असून, काही ठिकाणी १६०० ते १८०० मिलिमीटर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

२. गोदावरी नदी आणि धरण क्षेत्रातील परिस्थिती: नाशिक परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे.

  • नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी आणि पाईपलाईन तातडीने सुरक्षित स्थळी हलवाव्यात.

  • उत्तर महाराष्ट्रातील धरणे, विशेषतः निळवंडे, भंडारदरा आणि गंगापूर धरणे या पावसाच्या स्पेलमुळे भरण्यास मदत होणार असून ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

  •  

३. शेती व पेरणीचे व्यवस्थापन: ज्या भागांत अद्याप पावसाने हजेरी लावली नव्हती, तिथेही या ८ दिवसांत पाऊस कव्हर होणार आहे.

  • शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.

  • पावसाचा जोर जास्त असल्याने ओढे-नाले वाहण्याची शक्यता आहे, म्हणून पशुधन व जनावरांची विशेष काळजी घ्या.

  • वादळी वारा आणि विजेचे प्रमाण अधिक असल्याने जनावरे झाडाखाली बांधू नका.

  •  

४. प्रादेशिक प्रभाव: मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाचे वातावरण सक्रिय राहील. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर पट्ट्यातही पावसाला सुरुवात होत असून, पुढील ८ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र या पावसाच्या व्याप्तीत येणार आहे.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा