हवामान अंदाज: २ ते ८ जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टी; नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा!

हवामान अंदाज: २ ते ८ जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टी; नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा!
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Sandip N Nakade

Published:

२ ते ८ जुलै २०२६: मान्सूनचा 'हाय अलर्ट' आणि शेतीचे नियोजन

 

१. पावसाचा जोर आणि अतिवृष्टीचे क्षेत्र: हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, २ जुलै ते ८ जुलै हा काळ राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या कालावधीत मुंबई, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अतिवृष्टीमुळे नद्यांची पाणी पातळी वाढणार असून नदीकाठच्या रहिवाशांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

२. गोदावरी नदी आणि धरण क्षेत्रातील परिस्थिती: नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या उगम स्थानापासून ते कॅचमेंट एरियापर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याने नदीला मोठा पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • गोदावरी नदीतील वाढत्या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी आणि पाईपलाईन सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात.

  • उत्तर महाराष्ट्रातील निळवंडे, भंडारदरा आणि गंगापूरसारखी प्रमुख धरणे या पावसाच्या स्पेलमुळे लक्षणीयरीत्या भरतील.

  • १ ते ८ जुलै दरम्यान होणाऱ्या पावसामुळे लहान पाझर तलाव आणि बंधारे ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता आहे.

  •  

३. पेरणी आणि शेतीचे व्यवस्थापन: ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप बाकी आहेत, त्यांच्यासाठी ८ जुलैपर्यंतचा कालावधी अत्यंत अनुकूल आहे.

  • जमिनीमध्ये 'ईतभर' (पुरेशी) ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका.

  • पाऊस मुसळधार पडत असताना किंवा पाऊस सुरू असताना जनावरे झाडाखाली बांधू नका, कारण या दिवसांत वीज पडण्याचे प्रमाण अधिक असते.

  • बीड, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, जालना, संभाजीनगर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या पट्ट्यातही पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात सक्रिय राहणार असल्याने पेरण्यांची कामे ८ जुलैपर्यंत पूर्ण होतील.

  •  

४. भविष्यातील पावसाचा अंदाज: जून महिना जेमतेम पावसाचा गेला असला तरी, जुलैमध्ये मुसळधार पाऊस, ऑगस्टमध्ये पावसाचे दोन मोठे स्पेल आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. या सर्व घटनांमुळे यंदा पिके जोमदार येतील आणि दुष्काळाचे संकट पूर्णपणे टळणार आहे.

 

टीप: वरील माहिती हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या २ जुलै २०२६ रोजीच्या अंदाजावर आधारित आहे.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा