अतिवृष्टीमुळे पावसाचा फुल उत्पादनावर विपरीत परिणाम, श्रावणात दरवाढीची शक्यता...

अतिवृष्टीमुळे पावसाचा फुल उत्पादनावर विपरीत परिणाम, श्रावणात दरवाढीची शक्यता...
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Suraj Ghodke (null)

Published:

अतिवृष्टीमुळे पावसाचा फुल उत्पादनावर विपरीत परिणाम, श्रावणात दरवाढीची शक्यता...

मागील दोन आठवडे संततधार पावसाने झेंडू, गुलाब, निशिगंध यांसह इतर फुलांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फुल उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. 

श्रावणात फुलांना मागणी वाढणार आहे. उत्पादन घटल्याने मिरजेतील फुलांच्या बाजारात आवक घटली आहे. मात्र, अद्याप मागणी नसल्याने फुलांचे दर स्थिर आहेत.

श्रावण व गणेशोत्सव साजरा करताना फुलांना चांगली मागणी असल्याने सांगली जिल्ह्याच्या मिरजेत दररोज सकाळी भरणाऱ्या फुलांच्या एकमेव बाजारात खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होते. 

निशिगंध, झेंडू, गलांडा, लीली, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरित गृहातील विदेशी फुलांची आवक मिरजेतील फुलांच्या बाजारात होते.

श्रावणी सोमवार, नागपंचमी यासह विविध धार्मिक कार्यासाठी विविध फुलांना मागणी असते. मिरजेतून कर्नाटक व गोवा, कोकणासह इतर शहरांत फुलांची निर्यात होते. 

हरित गृहात उत्पादन होणाऱ्या फ्रेंच गुलाब, जर्बेरा व कार्नेशिया या फुलांची मोठ्या शहरात निर्यात होते. मात्र, या वर्षी संततधार पावसाने रोग पडल्यामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे.

श्रावणात निशिगंधासह पांढर्‍या फुलांनाही  मागणी असते. मात्र, पावसाने निशिगंधाचे नुकसान झाल्याने आवक घटली आहे. यामुळे श्रावणाची प्रतीक्षा करणाऱ्या फुल उत्पादक शेतकर्‍यांना पावसाचा फटका बसला आहे. 

पावसाने फुले खराब होऊन उत्पादन घटल्याने या वर्षी श्रावणात फुलांची दरवाढ होण्याची शक्यता आहे.

अति पर्जन्यमानाचा परिणाम:

जुलै महिन्यामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस झाला. या पावसाचा प्रतिकूल परिणाम फूलांच्या वाढीवर झाल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट झाली, परिणामी बाजारात फुलांची आवक कमी झाली आहे.

फुलांचे दर:

फुलांचे नावकिंमत
डच गुलाबपेंडी २५० रुपये
जर्बेरापेंडी ५० रुपये
निशिगंध७० रुपये किलो
झेंडू५० रुपये किलो
गलांडा६० रुपये किलो
गुलाब२०० रुपये शेकडा

 

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा