शेततळे योजना 2024
27-03-2024
शेततळे योजना 2024
महाराष्ट्र सरकार नेहमीच आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवीत असते. आता शेतकऱ्यांच्या मागणी नुसार महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे हि योजना सुरु केली आहे. मागेल त्याला शेततळे योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांना पाण्याचा स्थायी स्रोत उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाद्वारे सुरु करण्यात आलेली महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे तयार करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
तर मग चला मित्रांनो आपण या लेखात मागेल त्याला शेततळे अनुदान योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहू. जसे कि मागेल त्याला शेततळे योजना काय आहे, या योजनेसाठी लागणारी पात्रता, उद्दिष्टे, कागदपत्रे, ऑनलाइन नोंदणी, ऑफलाइन अर्ज, इत्यादी माहिती पाहणार आहोत. तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.
राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे त्यांच्या कुटुंबाचे जीवन हे शेती पिकावर अवलंबून असते परंतु काही वेळा पावसाचे प्रमाण हे अनिश्चित असते आणि राज्यातील काही भागातील शेती हि कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, यामुळे शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करतांना नेहमी पाणी टंचाईला समोर जावे लागते. या सर्व कारणांमुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते.या सततच्या पाणी टंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी शेततळे हे अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीसाठी नियमित आणि अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्धेशाने महाराष्ट्र शासनाने दिनांक 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागेल त्याला शेततळे योजना मंजूर करण्यात आली आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली.
या योजनेंतर्गत राज्यातील पाणी टंचाई ग्रस्त जिल्ह्यांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. व त्यांना या योजनेंतर्गत जास्तीत जास्त 30 x 30 x 3 मीटर या आकारमानाचे व कमीतकमी 15 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे देण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना इनलेट आउटलेट विरहित प्रकारामध्ये किमान 20 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल. या योजनेंतर्गत 30 x 30 x 3 मीटर शेततळ्यासाठी 50,000/- रुपये इतके अनुदान निश्चित करण्यात आले आहे. तर इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, त्यामुळे शेततळे ही योजना शेतकऱ्यास एक महत्वपूर्ण योजना ठरणार आहे.
मागेल त्याला शेततळे योजना
योजनेचे नाव | मागेल त्याला शेततळे योजना |
---|---|
कोणा व्दारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्याचे शेतकरी |
उद्देश्य | शेतकऱ्यांना शेतात शेततळे बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे |
लाभ | 50 हजार रुपये |
विभाग | नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन |
आधिकारिक वेबसाईट | http://egs.mahaonline.gov.in/ |
मागेल त्याला शेततळे योजना 2024 उद्दिष्टे
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी व अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, त्याचबरोबर जमिनीतल्या पाण्याची पातळी खोल गेलेली आहे.पावसाच्या पाण्यात पडलेला खंड आणि पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. शेततळयांमुळे शेतकऱ्यांना पावसाच्या खंडित कालावधीत कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल, त्यामुळे मागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरणार आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतात तळे खोदण्यासाठी अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे.
- शेती पिकाचे पाण्याविना होणारे नुकसान टाळणे व शेतीच्या उत्पन्नात वाढ करणे.
- राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित व प्रोत्साहित करणे.
- शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करून त्यांचे राहणीमान सुधारणे.
शेततळे योजना अंतर्गत शेततळ्यासाठी अनुज्ञेय आकारमान व अनुदान
या योजनेअंतर्गत खालील आकारमानापैकी एका प्रकारचे शेततळे घेण्यास मुभा असेल.
- शेततळे अनुदान योजना अंतर्गत वरीलप्रमाणे विविध आकारमानाच्या शेततळ्यांपैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याची मागणी शेतकऱ्यांना करता येईल.
- या योजनेंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहे, त्यामध्ये सर्वात मोठ्या आकारमानाचे शेततळे 30 x 30 x 3 मीटर असून सर्वात कमी आकारमानाचे शेततळे 15 x 15 x 3 मीटर आहे.
- 30 x 30 x 3 मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी 50,000/- रुपये इतके अनुदान निश्चित करण्यात आहे. तर 20 x 15 x 3 मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी अनुदानाची रक्कम ₹30,000 आहे. 15 x 15 x 3 मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी अनुदानाची रक्कम ₹22,500 आहे. इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील, 50,000/- रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतः खर्च करावी लागेल.
मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेचे फायदे
- ज्या भागातील शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती त्यांना या योजनेचा लाभ होऊन त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना दुरून सिंचनासाठी पाण्याचा प्रबंध करण्याची गरज पडणार नाही. शेततळ्यामुळे सिंचन करणे शक्य होईल.
- शेतकऱ्यांच्या पिकाचे पाण्याअभावी नुकसान होणार नाही. परिणामी पिकाच्या उत्पादनात वाढ होईल.
- शेती पिकाच्या नुकसानीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जातील.
- मागेल त्याला शेततळे योजनेचे मध्ये मिळणारे अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
मागेल त्याला शेततळे योजना नियम व अटी
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ दिला जाईल.
- शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीत कमी 60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
- या योजनेंतर्गत कृषी विभागाचे अधिकारी यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी, निश्चित केलेल्या आकारमानानुसार शेततळे बांधणे बंधनकारक राहील.
- शेततळे तयार करण्याचा आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम हे तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक असेल.
- लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःच राष्ट्रीय बँक किंवा इतर बँकमधील खाते क्रमांक सबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्ससह सादर सादर करणे गरजेचे आहे.
- शेतकऱ्याच्या 7/12 उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक असेल.
- शेताच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक आहे.
- शेततळ्याच्या कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम दिली जाणार नाही.
- शेततळ्याच्या दुरस्तीची आणि निगा राखण्याची जवाबदारी संबधित लाभार्थी शेतकऱ्यांची राहील.
- पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही, याची दक्षता शेतकऱ्यांनी स्वतः करावी.
- शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक असेल.
- इनलेट व आउटलेट विरहित शेततळी घेणाऱ्या लाभार्थ्याकडे शेततळ्यांमध्ये पाणी उचलून टाकण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणाचा खर्च स्वतः लाभार्थ्याने करावा.
- शेततळ्यातून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावी.
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसानभरपाई अनुज्ञेय राहणार नाही. याची नोंद लाभार्थी शेतकऱ्यांनी घ्यावी.
मागेल त्याला शेततळे अनुदान योजना लाभार्थी पात्रता
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- हि योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे.
- शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीतकमी 60 हेक्टर जमीन असावी. (यात कमाल मर्यादा नाही.)
- अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी इतर कोणत्याही योजनांच्या माध्यमातून शेततळे किंवा सामुदायिक शेततळे अथवा विहीर या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.
मागेल त्याला शेततळे योजना 2024 लाभार्थ्यांची निवड पात्रता
- दारिद्र्य रेषेखालील (BPL) शेतकरी आणि ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येईल.
- इतर प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची जेष्ठता यादीनुसार, प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्रधान्य याप्रमाणे सदर योजनेंतर्गत निवड करण्यात येईल.
मागेल त्याला शेततळे योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- जातीचा दाखला
- जमिनीचा 7/12 उतारा व ८–अ प्रमाणपत्र
- आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
- प्रतिज्ञा पत्र (स्वतःच्या स्वाक्षरी सहित)
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
मागेल त्याला शेततळे योजनेची अंमलबजावणी
जिल्हा पातळीवर मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व समन्वय समिती, या योजनेवर देखरेख करेल. योजना अंमलबजावणी, सनियंत्रण व समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती असेल. तालुका पातळीवर समिती शेततळयाला मान्यता देयील.
- महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या निधीमध्ये 10,000/- कोटी रुपये एवढ्या रकमेची तरतूद महामंडळाच्या स्थापनेच्या तारखेपासून पंचवीस वर्षाच्या कालावधीत योग्य हप्त्यांमध्ये विभागून देण्यात येईल अशी सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
- जलसंधारण विभागामार्फत राज्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान, नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम तसेच राज्यातील दुष्काळी भागांमध्ये संरक्षित सिचन व्यवस्था करण्यासाठी विभागवार पाच वर्षाचे आराखडे तयार करून जिल्ह्यानुसार पाझर तलाव, बंधारे, साठवण तलाव यांचे टप्प्या टप्प्यामध्ये बांधकाम करण्याचे नियोजन असून अशा कामांना महामंडळाच्या मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील गावे, टंचाईग्रस्त गावे यांना देखील प्रधान्य देण्यात येणार आहे.
शेततळे अनुदान अंतर्गत शेततळ्याच्या जागा निवडीचे तांत्रिक निकष
- ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी. काळी जमीन ज्यामध्ये चिकनमातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळयास योग्य असल्याने अशा जमिनीची निवड करण्यात यावी.
- मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक अशी जमीन असलेली जागा शेततळयास निवडू नये.
- क्षेत्र उपचाराची कामे झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळी प्राधान्याने देण्यात येतील.
- पाणी टंचाईग्रस्त गावातील लाभक्षेत्रात शेततळी घेण्यात यावीत. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय अटी व शर्ती लागू राहतील.
- ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण तीन टक्क्याच्या आत आहे, त्या ठिकाणी शेततळी घेण्यात यावीत.
- नाल्याच्या किंवा ओहाळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येऊ नये.
- इनलेट / आऊटलेट सहीत शेततळयासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळयाच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील.
- भोवतालच्या जमिनीत दलदल व चिखल होईल तसेच शेततळे व त्यातून पाणी पाझरून लगतच्या शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान होईल अशी जमीन शेततळ्यासाठी निवडण्यात येऊ नये.
- शेततळ्याला लागणारी जागा हि शेतकऱ्यांनी स्वखुषीने व विनामूल्य देणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र मागेल त्याला शेततळे योजनेची कार्यपद्धती
- मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळे खोदकामासाठी सबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून काम सुरु करण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर सबंधित कृषी सहाय्यक/ कृषी पर्यवेक्षक/ कृषी अधिकारी यांचेकडून शेतामढील सर्वे नंबर मध्ये तांत्रिकदृष्ट्या जागा निवड करण्यात आलेल्या ठिकाणी मंजूर आकारमानाचे शेततळे आखणी करून घेण्यात यावे, अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे लाभार्थ्याने शेततळ्याचे खोदकाम करून घावे.
- शेततळी बांधण्यासाठी लाभार्थ्याने स्वतः किंवा माजुराव्दारे, अन्य पर्यायी साधनांच्या सहाय्याने पूर्ण करवयाचा आहे. परंतु याकरिता मशीन उपलब्ध करून घाण्याची जबाबदारी सबंधित लाभार्थ्याची स्वतःची असेल.
- शेततळे खोदकामासाठी काम सुरु करण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांनी 30 दिवसात काम सुरु करावे आणि तसे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी स्वरूपात कळवावे.
- अपवादात्मक परिस्थितीमध्ये 30 दिवसापेक्षा जास्त मुदतवाढ द्यायची झाल्यास तालुकास्तरीय समितीने शेत परिस्थितीची खातरजमा करून आवश्यक असल्यास आणखी 30 दिवस मुदत वाढ द्यावी.
- शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यवर लाभार्थ्यांनी सबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याला लेखी स्वरुपात कळवावे. त्याबरोबर लाभार्थीने राष्ट्रीय बँक किंवा इतर बँक खात्याचे पासबुकाचे पहिल्या पानाचे झेरॉक्स जोडावी.
- लाभार्थी शेतकऱ्याने शेततळ्याचे काम पूर्ण झाल्याचे लेखी कळविल्या नंतर सबंधित कृषी अधिकारी कामाची प्रत्यक्ष मोजमाप करून घेऊन मापदंडाच्या नुसार देय असलेली अनुदानाची रक्कम योजनेच्या अंतर्गत निधी प्राप्त झाल्यावर 30 दिवसाच्या आत सबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
मागेल त्याला शेततळे योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागेल, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज आणि नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या या https://aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल.
- त्यानंतर आपल्याला या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
- यानंतर यशस्वीपणे नोंदणी झाल्यानंतर आपले युजरआयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
- त्यानंतर होम पेज उघडेल या होम पेजवर ‘’मागेल त्याला शेततळे’’ या पर्यायावर क्लिक करावे.
- यानंतर अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरून सोबत आवश्यकता ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर ऑनलाइन अर्जाची पावती डाऊनलोड करून स्वतः कडे ठेवावी.
- अशा प्रकारे मागेल त्याला शेततळे योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
मागेल त्याला शेततळे योजना अर्ज स्थिती पाहणे
- या योजनेंतर्गत अर्ज केल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या mahaonline.gov.in अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी.
- यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज क्रमांक भरून त्यांच्या अर्जाची स्थिती या वेबसाईटवर पाहू शकतात
मागेल त्याला शेततळे योजना हेल्पलाईन नंबर / संपर्क
- टोल फ्री नंबर : 1800 120 8040
- अधिकृत वेबसाईट : https://aaplesarkar.maharashtra.gov.in
- अर्ज करण्यासाठी लॉगिन संकेतस्थळ : https://egs.mahaonline.gov.in/Site/Shetatale