सोलापूरमध्ये म्हशीच्या दुधाच्या दरात मोठी वाढ; एका लिटरला 70 ते 90 रुपये दर

सोलापूरमध्ये म्हशीच्या दुधाच्या दरात मोठी वाढ; एका लिटरला 70 ते 90 रुपये दर
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Sandip N Nakade

Published:

सोलापूर : सोलापूर शहरातील दूधबाजारात दुधाच्या दरात एका फॅटला जवळपास दीड ते दोन रुपयांनी वाढ झाल्याने म्हैस दूध विक्री दरात मोठी वाढ झाली आहे.

 

 मागणीच्या तुलनेत पुरेसे दूध उपलब्ध नसल्याचा तसेच भेसळीवर कारवाया सुरू झाल्याचा परिणाम जाणवू लागला आहे. होम मैदानालगत दररोज दूध बाजार भरतो. सकाळी ९ च्यादरम्यान सुरू झालेला बाजार सायंकाळी चार वाजेपर्यंत चालतो. सध्या दुधाची उपलब्धता कमी झाल्याने दूध बाजार थोडा लवकर संपतो, असे सांगण्यात आले. मे महिन्यात या दूध बाजारात एका फॅटला साडेनऊ रुपयांपर्यंत दर पडत होता. 

 

जून महिन्यातही सुरुवातीला हाच दर होता. मात्र, या आठवड्यात दुधाची आवक फारच घटली असल्याने दूध विक्री दरात वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे राज्यात अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार घेताच राज्यात भेसळखोरांचे धाबे दणाणले असताना सोलापूर शहरातील दूध बाजारात दूध आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. याचा परिणाम म्हशीच्या दुधाला एका फॅटचा दर दीड ते दोन रुपयांनी वाढला आहे. यामुळे एका लिटरला ७० ते ९० रुपये दर मिळू लागला आहे. एका फॅटला १०.८० दर

 ◼️ बीबीदारफळ येथील दत्तात्रय जगताप यांचे शुक्रवारी १५ लिटर दूध बाजारात विक्री झाले. या दुधाला एका फॅटला १०.८० रुपये दर मिळाला. 

◼️ प्रति लिटर १११ रुपये २४ पैसे दराने १६६९ रुपये दुधातून मिळाले. या आठवड्यातच दरात मोठी वाढ झाली आहे. 

◼️ म्हशीचे एक लिटर दूध किमान ८० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असल्याचे बाजारात दूध विक्रीसाठी आलेल्यांनी सांगितले.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा