तुरीची लागवड करणार आहात? हे टॉप ३ वाण बदलू शकतात तुमचं उत्पन्न!

14-06-2025

तुरीची लागवड करणार आहात? हे टॉप ३ वाण बदलू शकतात तुमचं उत्पन्न!
शेअर करा

तुरीची लागवड करणार आहात? हे टॉप ३ वाण बदलू शकतात तुमचं उत्पन्न!

 

आजच्या अवर्षणप्रवण हवामानात जिथे पाण्याचा तुटवडा आहे, तिथे शेतकऱ्यांसमोर उत्पादन टिकवणे हे मोठं आव्हान ठरत आहे. मात्र अशा स्थितीतही तूर पिकाने शेतकऱ्यांना नवी आशा दिली आहे. कमी पाण्यात जगणारे हे पीक १५ ते २० क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत उत्पादन देऊ शकते, तेही योग्य वाण आणि तंत्रज्ञान वापरल्यास!

 

परभणीच्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तीन तुरीचे वाण सध्या महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. या वाणांना शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय कारण त्यांचे उत्पादन जास्त आणि रोगप्रतिकारक्षमता उत्तम आहे.

 

चला जाणून घेऊया हे उच्च उत्पादन देणारे टॉप ३ तुरीचे वाण!

 

१. बीडीएन-७११ (पांढरी तूर)

• कालावधी: १५० ते १५५ दिवस

• बियाण्याचे प्रमाण: प्रति एकर ५ ते ६ किलो

• सरासरी उत्पादन: ७ ते ८ क्विंटल प्रति एकर

• वैशिष्ट्ये:

- दाण्याचा रंग पांढरा

- कोरडवाहू शेतीसाठी योग्य

- मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम

- शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह वाण म्हणून ओळख

 

२. बीडीएन-७१६ (लाल तूर)

• कालावधी: १६५ ते १७० दिवस

• बियाण्याचे प्रमाण: प्रति एकर ५ ते ६ किलो

• सरासरी उत्पादन: ८ ते ९ क्विंटल प्रति एकर

• वैशिष्ट्ये:

- दाण्याचा रंग लाल, शेंगांचा रंग पूर्ण हिरवा

- रोगप्रतिरोधक क्षमता उच्च

- चव, रंग व शिजवण्याच्या गुणांमुळे बाजारात मागणी जास्त

 

३. बीडीएन-२०१३-४१ (गोदावरी – पांढरी तूर)

• कालावधी: १६० ते १६५ दिवस

• बियाण्याचे प्रमाण: प्रति एकर ५ ते ६ किलो

• सरासरी उत्पादन: १० ते ११ क्विंटल प्रति एकर

• वैशिष्ट्ये:

- दाण्याचा रंग पांढरा, १०० दाण्यांचे वजन ११ ग्रॅम

- महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पादन देणारा वाण

- इतर वाणांपेक्षा उत्तम उत्पादनक्षमता

 

उत्तम उत्पादनासाठी केवळ शेतीचे नियोजनच नव्हे, तर योग्य वाणांची निवड सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. बीडीएन-७११, बीडीएन-७१६ आणि गोदावरी (बीडीएन-२०१३-४१) हे वाण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ करू शकतात. कमी पाण्याच्या परिस्थितीत, योग्य खत व्यवस्थापन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास या वाणांपासून १५ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन घेणे शक्य आहे.

हे पण पहा : पंजाब डख यांचा शेतकऱ्यांना तातडीचा अंदाज, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता…

Tur varieties, उच्च उत्पादन वाण, BDN 711, BDN 716, Godavari Tur, कोरडवाहू तूर शेती, Disease resistant tur

शेअर करा

संबंधित शेती विषयक माहिती

Loading

शॉप

Loading