गहू बाजारभाव: पुणे आणि मुंबईत गव्हाला विक्रमी दर; पाहा २४ एप्रिलचे राज्यातील ताजे भाव

गहू बाजारभाव: पुणे आणि मुंबईत गव्हाला विक्रमी दर; पाहा २४ एप्रिलचे राज्यातील ताजे भाव
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: sanchit ramdas shinde

Published:

गहू बाजारभाव: पुणे आणि मुंबईत गव्हाला विक्रमी दर; पाहा २४ एप्रिलचे राज्यातील ताजे भाव

 

महाराष्ट्र (कृषी क्रांती): राज्यात सध्या गव्हाची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून विविध बाजार समित्यांमध्ये दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे. आज २४ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये गव्हाचे दर कसे राहिले, याचा आढावा खालीलप्रमाणे आहे.

 

पुणे आणि मुंबईत 'शरबती'ची हवा

आजच्या लिलावात पुणे बाजार समितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुणे मार्केटमध्ये शरबती गव्हाला किमान ४४०० ते कमाल ५६०० रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे. त्याखालोखाल मुंबई बाजारपेठेत लोकल गव्हाचे दर २९०० पासून ५००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

 

शरबती गव्हाचे दर (प्रति क्विंटल)

शरबती गव्हाला सध्या बाजारात मोठी मागणी आहे.

  • सोलापूर: आवक ८२४ क्विंटल, कमाल दर ३८८५ रुपये.

  • अकोला: कमाल दर ३५०० रुपये.

  • नागपूर: कमाल दर ३५०० रुपये.

  • हिंगोली: कमाल दर ३००० रुपये.

  •  

लोकल गव्हाची स्थिती

लोकल गव्हाची आवक राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत सुरू आहे.

  • सांगली मध्ये लोकल गव्हाला ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

  • छत्रपती संभाजीनगर मध्ये २६९० रुपये, तर अकोला आणि अमरावती मध्ये कमाल दर २५०० रुपयांवर स्थिरावले आहेत.

  • छोट्या बाजारपेठा: जामखेड (२४०० रु.), सटाणा (२६५१ रु.) आणि तासगाव (३५४० रु.) येथेही समाधानकारक दर पाहायला मिळाले.

  •  

२१८९ वाणाचे बाजारभाव

गव्हाच्या २१८९ या वाणाची आवक मध्यम स्वरूपाची असून, दौंड-यवत येथे या वाणाला सर्वाधिक २६५० रुपये भाव मिळाला. दुधणी मध्ये २८५० रुपये तर देवळा बाजार समितीत २५१० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाली.
 

हे पण वाचा : जिल्ह्यानुसार गव्हाचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा