PM किसानचं खातं अचानक बंद झालं? घाबरू नका – पहा काय आहे नवी अपडेट!

PM किसानचं खातं अचानक बंद झालं? घाबरू नका – पहा काय आहे नवी अपडेट!
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Suraj Ghodke (null)

Published:

PM किसानचं खातं अचानक बंद झालं? घाबरू नका – पहा काय आहे नवी अपडेट!

भारत सरकारच्या पीएम किसान योजनेत लाखो शेतकरी सहभागी आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, काही शेतकऱ्यांनी अज्ञानामुळे किंवा चुकून Voluntary Surrender हा पर्याय निवडल्याने त्यांचे खाते बंद झाले आणि त्यांना पुढील हप्ते मिळणे थांबले आहे.

ही चूक सुधारण्याची संधी PM Kisan Portal वर उपलब्ध झाली आहे. आता ‘Voluntary Surrender Revocation’ या पर्यायाद्वारे खाते पुन्हा सुरू करता येणार आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे, कारण यामुळे हजारो शेतकऱ्यांना पुन्हा योजनेचा लाभ मिळणार आहे.

खाते पुन्हा सुरू करण्याची सोपी प्रक्रिया:

  • PM Kisan Portal (PM Kisan Samman Nidhi) या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • Farmers Corner विभागातील 'Voluntary Surrender Revocation' या पर्यायावर क्लिक करा.
  • आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाका आणि ‘Get OTP’ वर क्लिक करा.
  • आलेला OTP बॉक्समध्ये भरून ‘Verify OTP’ वर क्लिक करा.
  • पुढील विंडोवर आपली शेतकरी माहिती दिसेल.
  • खालील स्वयंघोषणापत्र (Self Declaration) वाचा आणि ‘Yes’ वर क्लिक करून खातं पुन्हा सुरू करण्यास संमती द्या.
  • Proceed For E-KYC’ या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढील अटी-शर्ती स्वीकारा आणि ‘Submit’ करा.
  • पुन्हा एकदा आधार संलग्न मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाकून खात्री करा.

यशस्वी व्हेरिफिकेशननंतर तुमच्या मोबाईलवर खातं सुरू झाल्याचा मेसेज येईल.

हे पण पहा: अवकाळी पाऊस का पडतो? जाणून घ्या वैज्ञानिक स्पष्टीकरण..!

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा